हिंदुद्वेषी विज्ञापनाच्‍या विरोधात  #AamirKhan_Insults_HinduDharma  हा ट्‍विटरवर ट्रेंड पहिल्‍या क्रमांकावर !

‘एयू स्‍मॉल फायनान्‍स बँके’च्‍या विज्ञापनामध्‍ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान !

मुंबई – यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्‍या ‘एयू स्‍मॉल फायनान्‍स बँके’च्‍या विज्ञापनामध्‍ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्‍यात आला आहे. यामध्‍ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे. या वेळी वर पहिल्‍यांदा घरात प्रवेश करतो, असे दाखवले आहे. या विज्ञापनास हिंदूंकडून विरोध केला जात आहे. याच अनुषंगाने ट्‍विटरवर  #AamirKhan_Insults_HinduDharma या नावाने ‘हॅशटॅग ट्रेंड’ (एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे) करण्‍यात आला. याला हिंदूंनी मोठा प्रतिसाद दिल्‍याने हा ‘ट्रेंड’ काही वेळ राष्‍ट्रीय स्‍तरावर पहिल्‍या क्रमांकांवर होता. नंतर काही घंटे तो पहिल्‍या ५ ट्रेंडमध्‍ये होता. या ट्रेंडवर ३५ सहस्रांहून अधिक जणांना ट्‍वीट्‍स केले. यासह सदर बँक आणि अभिनेते आमीर खान यांनी क्षमा मागितली पाहिजे आणि हे विज्ञापने हटवले पाहिजे, अशीही मागणी टि्‌वटरवर करण्‍यात आहे.

१. या ट्‍वीट्‍सद्वारे हिंदूंनी अनेक प्रश्‍न विचारले आहेत. एकाने म्‍हटले, ‘बँकेला हिंदूंच्‍या परंपरांमध्‍ये हस्‍तक्षेप करण्‍याचा अधिकार कुणी दिली ?.’

२. अन्‍य एकाने विचारले आहे की, आमीर खान कधी तीन तलाक आदी इस्‍लामी परंपरांमध्‍ये पालट करण्‍याच्‍या विज्ञापनांमध्‍ये काम करण्‍याचे धाडस करतील का ?