कास पठार (जिल्हा सातारा) येथील श्री घाटाई देवी मंदिर परिसरात मद्य-मांसाच्या मेजवाण्या !

तिर्थक्षेत्र परिसरातील हे ओपन बार थांबवणार कोण ? असा प्रश्‍न भाविकांकडून उपस्थित होत आहे.

सार्वजनिक विहिरींच्या देयकासाठी ३७ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍याला अटक !

लाचखोरी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी !

भोर (पुणे) येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीतून २ आरोपी पसार

कह्यात असलेल्या आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस जिल्हा अथवा राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

बंगालमध्ये बॉम्बच्या आक्रमणात राज्यातील मंत्री झाकीर हुसेन घायाळ !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील मंत्रीही सुरक्षित नाहीत, यावरून तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उघड होते ! लोकशाहीत कार्यरत असे सरकार जनतेसाठी लज्जास्पदच !

सिंगापूर येथील प्राचीन मंदिरातील पुजार्‍याकडून मंदिरातील दागिने गहाण ठेवत मिळालेल्या पैशाचा अपहार

श्री मरिअम्मन या प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी कंदसामी सेनापती यांनी मंदिरातील मौल्यवान दागिने परस्पर गहाण ठेवत मिळालेल्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पिसादेवी (जिल्हा संभाजीनगर) येथे पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

घरगुती वादातून संयम न बाळगता हत्या होणे हे समाजाची अध:पतनाकडे वाटचाल झाल्याचे लक्षण आहे. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

जत (जिल्हा सांगली) येथील गुड्डापूरच्या श्री दान्नमादेवी देवस्थानच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

स्थानिक न्यायालयाने ही तक्रार प्रविष्ट करून घेत जत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद करून चौकशी करावी, असा आदेश दिला आहे.

मुंबई येथे वाहतूक पोलिसाला मारहाण, ४ तृतीयपंथियांना अटक

कठोर कारवाई होत नसल्यामुळे तृतीय पंथियांना कधीच कायद्याचेही भय वाटत नाही !

वसई येथे लोकलगाडीत तरुणीवर जीवघेणे आक्रमण करत लुटले

लोकल चालू होताच आरोपी डब्यात चढला आणि भ्रमणभाष व गळ्यातील साखळी ओढली.

चंद्रपूर येथे स्थानिकांना रोजगार न दिल्याच्या कारणावरून मनसेकडून जी.आर्.एन्. आस्थापनाच्या कार्यालयाची तोडफोड !

मनसेच्या कार्यकर्त्यांवर दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.