मुंबई येथे वाहतूक पोलिसाला मारहाण, ४ तृतीयपंथियांना अटक

वहातूक पोलिसांवर आक्रमण होण्याचे काही व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत ! कठोर कारवाई होत नसल्यामुळे तृतीय पंथियांना कधीच कायद्याचेही भय वाटत नाही !

मुंबई – वाहतुकीचे नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस हवालदार विनोद सोनवणे यांच्यावर ४ तृतीयपंथियांनी आक्रमण केल्याचा प्रकार १६ फेब्रुवारी यादिवशी येथील छेडानगर जंक्शन परिसरात घडला आहे.

या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून लहू मकासरे, विक्की कांबळे, तनु ठाकूर आणि जेबा शेख यांना अटक करण्यात आली आहे.