वसई येथे लोकलगाडीत तरुणीवर जीवघेणे आक्रमण करत लुटले

  •  महिलांच्या डब्यातील पोलीस कुठे गेले ?
  • असुरक्षित लोकल प्रवास !
वसई येथे लोकलगाडीत तरुणीवर जीवघेणे आक्रमण

ठाणे, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – वसई येथे लोकलगाडीत तरुणीवर जीवघेणे आक्रमण करत लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. या आपक्रमणात ही तरुणी गंभीररीत्या घायाळ झाली आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस वसई आणि नायगाव रेल्वे स्थानकावरील सी.सी.टी.व्ही.ची पडताळणी करत असून पुढील अन्वेषण चालू आहे.

सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तरुणीने वसई रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरून अंधेरीला जाणारी धिमी लोकल पकडली. लोकल चालू होताच आरोपी डब्यात चढला आणि तिच्याकडील भ्रमणभाष खेचण्याचा प्रयत्न करू लागला. यानंतर त्याने तिच्या गळ्यातील साखळी ओढली. तिने विरोध करताच आरोपीने तरुणीवर आक्रमण केले यात ही तरुणी गंभीररीत्या घायाळ झाली. चोरट्याने तुटलेल्या साखळीचा काही भाग उचलून नायगाव रेल्वेस्थानक येताच उडी मारून पळ काढला. तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे असून उपचार चालू आहेत.