Dead Cow : प्रयागराज : हिंदूंच्या घराबाहेर फेकण्यात आले गायीच्या वासराचे अवशेष

महाकुंभमेळा संपताच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे महाकुंभमेळ्याच्या समाप्तीच्या ४८ घंट्यांच्या आतच शहरातील दरियाबाद पोलीस ठाण्याजवळील हिंदूंच्या घरांसमोरील रस्त्यावर आणि नाल्यात एका वासराचे डोके आणि पाय फेकलेले आढळले. हे पाहून स्थानिक हिंदूंनी  संताप व्यक्त करत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून अन्वेषण चालू केले. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी येथील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळले. पोलीस अधिकारी संजय द्विवेदी यांनी सांगितले की, कुणीतरी हे जाणूनबुजून वातावरण बिघडवण्यासाठी केले आहे.

मुसलमानांकडून कृत्य करण्यात आल्याचा संशय ! – पोलीस

पोलिसांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या गुन्ह्यामध्ये म्हटले आहे की, हिंदूंच्या घरांवर खूण करण्यात आली होती आणि गायींचे अवशेष जाणीवपूर्वक तेथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात ही घटना घडली, त्या परिसरात मुसलमान वस्ती असल्याने हे कृत्य मुसलमानांमधील एखाद्या अराजकतावादी घटकाने केले असावे.

गेल्या ५ महिन्यांतील तिसरी घटना

स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. गेल्या ५ महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. यासंदर्भातील माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात येत आहे; मात्र ज्यांनी गायीचे डोके आणि पाय कापून फेकून दिले, त्यांना आजपर्यंत पकडण्यात आलेले नाही. पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. (३ घटना घडेपर्यंत कारवाई न करणारे पोलीस उत्तरप्रदेशातील आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक)

संपादकीय भूमिका

गोवंशांची हत्या कोण करते, हे स्पष्ट आहे. त्यामुळे हिंदूंना डिवचण्याचा हा प्रकार करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना हे थांबणार नाही !