Islamists Plan Cow Slaughter : बांगलादेशात बंगाली नववर्षानिमित्त १०० गायींची हत्या करण्याची जिहादी मुसलमानांची धमकी !

अंतरिम सरकार धमकीविषयी गंभीर नाही !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशामध्ये १४ एप्रिलला ‘पोहेला बैशाख’ या बंगाली नववर्षाचे इस्लामी सणात रूपांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही जिहादी मुसलमानांनी या सणाच्या निमित्ताने १०० गायींची हत्या करण्याची धमकी दिली आहे. यामुळे हिंदु समुदाय पुष्कळ चिंतेत पडला आहे. पोहेला बैशाख हा वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि शेत कापणीच्या हंगामाच्या आनंदाचा उत्सव साजरा करणारा सण आहे.

१. प्रतिवर्षी पोहेला बैशाखनिमित्त ढाका येथील रमना पार्क येथील रमना बतामुल वटवृक्षाखाली एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम वर्ष १९६१ मध्ये स्थापन झालेल्या ‘छायत संगीत विद्यालया’द्वारे चालवला जातो आणि बंगाली संस्कृती आणि संगीताला प्रोत्साहन दिले जाते.

२. बांगलादेशाच्या अंतरिम सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी यांना यासंदर्भात सांगितले की, लोक सामाजिक माध्यमांवर पुष्कळ काही बोलतात. आपण प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देऊ शकत नाही. पोहेला बैशाख हा एक मोठा सण आहे. तो नेहमीप्रमाणे साजरा केला जाईल. मी एवढेच म्हणू शकतो.

३. याआधीही १४ एप्रिल २००१ या दिवशी जिहादी आतंकवादी संघटना ‘हरकत-उल-जिहाद-अल-इस्लाजी’ने रामना पार्कमध्ये २ बाँबस्फोट घडवून आणले होते, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक जण घायाळ झाले होते. या प्रकरणी मुफ्ती (शरीयत कायद्यानुसार न्यायनिवाडा करणारा) अब्दुल हन्नान, मौलाना (इस्लामचा अभ्यासक) अकबर हुसेन, मौलाना महंमद ताजुद्दीन, हाफिज जहांगीर आलम बदर, मौलाना अबू बकर, मुफ्ती शफीकुर रहमान, मुफ्ती अब्दुल हैई आणि आरिफ हसन यांना वर्ष २०१४ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच मौलाना अबू ताहेर, मौलाना सब्बीर उपाख्य अब्दुल हन्नान, मौलाना याह्या, मौलाना शौकत उस्मान, मौलाना अब्दुल रौफ आणि शहादत उल्लाह यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ताजुद्दीन, हाफिज जहांगीर, मौलाना अबू बकर, मुफ्ती शफीकुर आणि मुफ्ती हे आतंकवादी अद्याप पसार आहेत. (मौलाना, मुफ्ती पद असणारे मुसलमानांचे धार्मिक नेते आतंकवादी कारवाया करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण लागत नाही, तसेच जिहादी मुसलमानांना गोहत्या करण्यासाठी कारण लागत नाही. त्यातही हिंदूंना डिवचण्यासाठी सणांच्या वेळी ते जाणीवपूर्वक गोहत्या करतात. तेच या धमकीतून पुन्हा दिसून येत आहे !