‘पंचगव्य आणि ओझोन चिकित्सा’ : कर्करोग किंवा कोणत्याही दीर्घकालीन दुर्धर आजारांवर नवसंजीवनी !

आजच्या काळातील अत्यंत यशस्वी ठरलेली आणि ठरत असलेली पंचगव्य अन् ओझोन चिकित्सा !

आधुनिक वैद्यकशास्त्र (ॲलोपॅथी) आणि आयुर्वेद या दोन्ही शाखांमध्ये विविध आजारांवर प्रभावी उपचारपद्धतींचा अभ्यास केला जातो. काही दुर्धर आजारांमध्ये आधुनिक चिकित्सा मर्यादित ठरत असतांना पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून विकसित झालेल्या उपचारपद्धत प्रभावी ठरू शकतात. आयुर्वेद, पंचगव्य आणि ओझोन थेरपी यांच्या संयोगाने शरिरातील प्रतिकारशक्ती वाढवणे आणि मज्जासंस्थेचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे. पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य दिलीप कुलकर्णी यांनी कोरोना महामारीच्या काळात ‘पंचगव्य आधारित ओझोन’ या पद्धतीने केलेले हे संशोधन अत्यंत यशस्वी ठरले आहे. ते प्रामुख्याने कोरोना महामारीसाठी होते; पण त्या औषधाच्या विविध प्रयोगशाळांमधील चाचण्यांमध्ये त्याचे आधुनिक निकषांवर आधारित विविध गुणधर्म सिद्ध झाले आहेत. त्यामध्ये रोगजंतू (व्हायरस), बॅक्टेरिया आणि फंगस (बुरशी) नाशक गुणधर्म सिद्ध झाले आहेत. अशा प्रकारे संशोधन करण्यात आलेली ती जगातील एकमेव चिकित्सा पद्धती आणि औषधे आहेत. आजही कर्करोग, मधुमेह, रक्तदाब किंवा कोणत्याही दीर्घकालीन आजारांवर याच पद्धतीने वैद्य दिलीप कुलकर्णी यांच्याकडे चिकित्सा केली जाते. आतापर्यंत शेकडो कर्करोगाच्या रुग्णांना याचा लाभ झालेला आहे आणि अजून ही देशविदेशातून अनेक जण या चिकित्सेसाठी येत असतात. तुलनात्मक दृष्टीकोनातून ही कोणताही दुष्परिणाम नसलेली, रुग्ण आनंदाने घेत असलेली आणि आर्थिक बोजा सुसह्य असणारी चिकित्सा आहे.

(उत्तरार्ध)

या आधीचा भाग वाचण्यासाठी यथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/895561.html

१. पंचगव्य म्हणजे काय ?

केवळ भारतीय वंशाच्या गायींमध्येच शरीर रचना आणि शरीर क्रिया यांमध्ये काही विशिष्ट गुणधर्म आढळले आहेत. ज्या गायीला पाठीवर वशिंड (Hump) असते, ती ‘भारतीय वंशाची गाय’ म्हणून ओळखली जाते. या गायींमध्ये हे गुणधर्म पूर्वीपासून अस्तित्वात होतेच, केवळ आता ते आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांमधून विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत आले आहेत इतकेच ! पंचगव्य यातील पंच म्हणजे ५ आणि गव्य् म्हणजे गायीपासून मिळणार्‍या वस्तू किंवा पदार्थ ! ते ५ पदार्थ, म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि गोमय !

या प्रत्येकाचे स्वत:चे गुणधर्म आणि एकमेकांसह मिश्रण करून मिळणारे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत.

वैद्य दिलीप कुलकर्णी

२. पंचगव्यातील प्रमुख घटक आणि त्यांचे लाभ

अ. गायीचे दूध : यात ‘अँटीऑक्सिडंट्स’, जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात, जे स्नायूंना मजबूती देतात.

आ. दही : पचनसंस्था सुधारते आणि शरिरातील चयापचय प्रक्रियेत साहाय्य करते.

इ. तूप : मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी उत्तम ‘टॉनिक’ (बलवर्धक). यामुळे ‘न्यूरोट्रान्समिशन’ सुधारते आणि मज्जातंतूंवरील दाब न्यून होतो.

ई. गोमूत्र : नैसर्गिक ‘डिटॉक्सिफायर’ असून शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास साहाय्य करते. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि नायट्रोजन संयुगे मज्जातंतूंची पुनर्बांधणी करतात.

उ. गोमय (शेण) : यात असलेले ‘अँटीबायोटिक’ (प्रतिजैविके) आणि ‘अँटीव्हायरल’ (विषाणुरोधी) घटक शरिराच्या संरक्षण व्यवस्थेला बळकटी देतात.

३. ओझोन थेरपी

ओझोन म्हणजे O3 (त्रि-ऑक्सिजन), जो ऑक्सिजनपेक्षा अधिक शक्तीशाली आहे. याचा उपयोग शरिरात ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ करून पेशींना नवजीवन देण्यासाठी केला जातो.

४. ओझोन थेरपीचे लाभ

अ. पेशींची पुनर्बांधणी करण्यास साहाय्य

आ. रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेला ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते

इ. ‘व्हायरस’, बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट करण्याची क्षमता

ई. कर्करोगाच्या पेशी वाढू न देण्याचे सामर्थ्य

५. विज्ञान आणि संस्कृती यांचा सुवर्णमध्य

कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक जागतिक स्तरावरील आणि स्थानिक तज्ञ, शास्त्रज्ञ, राज्य अन् केंद्र सरकार यांमधील विविध लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठित लोक, उद्योजक, पोलीस कर्मचारी अशा सहस्रो लोकांनी पंचगव्य आधारित ओझोन चिकित्सेने सिद्ध केलेल्या या औषधाचा लाभ घेतलेला आहे. ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जी.बी.एस्.)सारख्या गुंतागुंतीच्या आजारांसाठीही पंचगव्य आणि ओझोनचा संयोग नैसर्गिक अन् सुरक्षित उपाय ठरू शकतो, ज्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. या सर्व विज्ञानाधिष्ठित संशोधनाला भारत सरकारने मान्यता दिली असून केंद्र सरकारच्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’मध्ये (वैद्यकीय संशोधन चाचण्यांमध्ये) ते अत्यंत यशस्वी ठरले आहे.

भारताच्या प्राचीन ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपण नवीन उपचारपद्धत विकसित करू शकतो की, जी स्वस्त, सुलभ आणि परिणामकारक ठरेल. म्हणूनच या उपचारपद्धतींवर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे, जेणेकरून विज्ञान आणि संस्कृती यांचा सुवर्णमध्य साधता येईल अन् संपूर्ण मानवजातीला त्याचा लाभ मिळेल. भारताच्या प्राचीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधल्यास आरोग्य क्षेत्रात क्रांतीकारी पालट घडवता येतील. पंचगव्य आणि ओझोन यांच्या संयोगाने विकसित झालेल्या औषधांसारख्या उपचारपद्धत भविष्यात आरोग्य सेवेसाठी प्रभावी ठरू शकतात. यामुळे केवळ देशातील नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांना स्वस्त, सुलभ आणि सुरक्षित वैद्यकीय पर्याय मिळू शकतील. विज्ञान आणि संस्कृती यांचा सुवर्णमध्य साधल्यास भारत केवळ आरोग्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होईलच; पण जागतिक स्तरावरही ‘एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र’ म्हणून उदयास येईल. म्हणूनच या प्राचीन परंपरांवर आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून अधिक संशोधन करून त्याचा व्यापक लाभ घेण्याची वेळ आता आली आहे !

– वैद्य दिलीप कुलकर्णी, पंचगव्य-ओझोन चिकित्सा संशोधक आणि आयुर्वेदाचार्य, कोथरूड, पुणे. (७.३.२०२५)