सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर येथील पत्रकारांशी मुक्त संवाद !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी ७ मार्च २०२४ या दिवशी सोलापूरमधील पत्रकारांशी संवाद साधला, या वेळी पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि श्री. राजहंस यांनी दिलेली उत्तरे येथे देत आहोत.

संपादकीय : आगीच्या दुर्घटनांमागे काळेबेरे ?

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय इमारतींना आग लावण्यामागे षड्यंत्र असेल, तर ते लोकशाहीला घातक !

लाच घेतांना ४ शासकीय कर्मचार्‍यांना अटक; एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश !

वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली.

अग्निशस्त्र आणि ५ जिवंत काडतुसे बाळगणार्‍या प्रवाशाला सोडून दिले !

आतंकवादी आक्रमणाची टांगती तलवार डोक्यावर असतांनाही लोकांच्या जिवाशी खेळणार्‍या अशा भ्रष्ट जवानांना कडक शासन हवे !

लोकप्रतिनिधी आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे ‘लायसन्स’ मिळाले असे नाही ! – देवेंद्र फडणवीस

‘व्होट के बदले नोट’ प्रकरणात लोकप्रतिनिधींना कुठलेही कायदेशीर संरक्षण मिळणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

2 NHAI officials arrested : नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग महाव्यवस्थापकास २० लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

एका खासगी आस्थापनाची प्रलंबित देयके मान्य करण्यासाठी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे याला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) येथे अटक केली.

महामार्गावरील मजार न हटवल्यास शेजारी हनुमानाचे मंदिर उभारू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

धर्मांध लोकांच्या हातात अधिकार येतात, तेव्हा ते इस्लामवृद्धीसाठी कशी अवैध कृत्ये करतात, हे लक्षात घ्या ! यामुळे धर्मांधांना अधिकार देतांना शंभरदा विचार करावा, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

संदेशखालीतील अत्याचारांमुळे बंगालमध्ये तणाव !

संदेशखाली येथील पीडित महिलांनी शाहजहान शेख आणि त्याचे समर्थक यांवर अत्याचार, लैंगिक छळ, भूमी बळकावणे असे गंभीर आरोप केले आहेत.

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

पुणे येथे लाच स्वीकारतांना एकाला अटक !

एका ४२ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ‘सायबर विभागा’कडे ऑनलाईन तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. त्याचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे.