चांदवड (नाशिक) येथील राष्ट्रीय महामार्गावर मजार बांधल्याचे प्रकरण !
मजार आणि मौलाना यांचा २० सहस्र रुपये खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खात्यातून !
चांदवड (जिल्हा नाशिक) – येथील राष्ट्रीय महामार्गावर सोग्रस फाट्यावर मधोमध एक मजार उभारण्यात आली आहे. गंभीर गोष्ट म्हणजे या मजारीचा खर्च, तसेच ही मजार बांधल्यावर तिच्या कार्यक्रमासाठी मालेगावहून आलेल्या मौलवीला तब्बल २० सहस्र रुपये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया) च्या खात्यामधून दिल्याचे उघड झाले आहे. ही मजार तात्काळ हटवली न गेल्यास तिथे शेजारी हनुमानाचे मंदिर उभारू, अशी चेतावणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
धर्मांध अधिकार्याने संधी साधून प्राधिकरणातून मजारीसाठी पैसे घेतले !
चांदवड येथील पथकरनाक्यावर काम करणार्या हश्मी या धर्मांध अधिकार्याचे या भागात वर्चस्व असल्याचे समोर आले आहे. त्याने संधी साधून ही मजार उभी केली असल्याने त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी होत आहे. त्याला साहाय्य करणार्यांची नावेही पुढे आली पाहिजेत.
संपादकीय भूमिका
मजारी उभ्या राहीपर्यंत संबंधित खात्यांची प्रशासने त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्या सर्व संबंधित खात्यांच्या अधिकार्यांना जाब विचारला गेला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करायला हवे !
राष्ट्रीय महामार्गावरील मजारीसाठी आलेल्या मौलानाला शासकीय खात्यातून पैसे देणार्या अधिकार्यावर काय कारवाई होणार ते जनतेला कळले पाहिजे ? अशा रस्त्यांवरील मजारींसाठी आलेल्या किती मौलवींना शासकीय खात्यातून पैसे गेले असतील ? ते शोधून सव्याज वसूल करावेत !
धर्मांध लोकांच्या हातात अधिकार येतात, तेव्हा ते इस्लामवृद्धीसाठी कशी अवैध कृत्ये करतात, हे लक्षात घ्या ! यामुळे धर्मांधांना अधिकार देतांना शंभरदा विचार करावा, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?