पुणे, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – एका ४२ वर्षीय व्यक्तीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरणी ‘सायबर विभागा’कडे ऑनलाईन तक्रार प्रविष्ट (दाखल) झाली होती. त्याचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्याकडे आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी तुषार बनकर यांनी संजय नरळे यांच्यासाठी १ लाख रुपये लाच मागितली. हे तक्रारदार व्यक्तीला मान्य नसल्याने त्याने भ्रष्टाचार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या साहाय्याने सापळा रचून २५ सहस्र रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारतांना तुषार यांना अटक केली आहे. तुषारवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (यातून पोलीस अधिकारी आणि दलाल यांचे साटेलोटे तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होतो. असे असल्यास हे गंभीर आहे ! – संपादक)