रावेरखेडी येथील थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी योजनेची आखणी !

थोरले बाजीराव पेशवे समाधी स्थळ, रावेरखेडी

पुणे – इतिहासाने अजेय योद्धा म्हणून गौरवलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे रावेरखेडी (मध्यप्रदेश) येथील समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार आणि विकास यांसाठी १०० कोटी रुपयांची योजना आखली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील २७ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमीपूजन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पात थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा, समाधी स्थळाजवळ शनिवारवाडा येथील देहली दरवाजाची प्रतिकृती असलेला भव्य घाट, काशीबाई यांनी बांधलेल्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार, संग्रहालय, पर्यटन निवास, व्यापारी संकुल आणि समाधी स्थळाकडे जाण्यासाठी चौपदरी रस्ता करण्यात येणार आहे.