हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे मागणी
पिंपरी, १५ सप्टेंबर (वार्ता.) – वर्षभर सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे होणार्या प्रदूषणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून केवळ गणेशोत्सवाला लक्ष्य केले जाते. कृत्रिम तलावात मूर्तीविसर्जन, मूर्तीदान यांसारख्या अशास्त्रीय संकल्पना राबवल्या जातात. अशा संकल्पनांद्वारे होणारी विटंबना रोखावी आणि गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात विसर्जन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधील भाजपच्या महापौर सौ. उषा (माई) ढोरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच भाजपचे स्थायी समिती सभापती श्री. नितीन लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते श्री. राजू मिसाळ यांनाही निवेदन देण्यात आले. यासह उपायुक्त कार्यालयातही यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.