मुरुंबा (जिल्हा परभणी) येथे ८०० हून अधिक कोंबड्या मृत्युमुखी !
‘बर्ड फ्लू’च्या आजाराचे संकट घोंगावत असतांनाच घडलेली ही घटना चिंताजनक आहे !
‘बर्ड फ्लू’च्या आजाराचे संकट घोंगावत असतांनाच घडलेली ही घटना चिंताजनक आहे !
राज्यातील विविध जिल्ह्यांत पक्ष्यांची पडताळणी केली असून राज्यात बर्ड फ्लू अस्तित्वात नाही, असे विधान पशूसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले आहे. ठाणे येथे १६ पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूची शंका निर्माण झाली होती; मात्र त्या पक्ष्यांची बर्ड फ्लूची केलेली पडताळणी नकारात्मक आली.
रोममध्ये ख्रिस्ती नववर्षानिमित्त आतषबाजी करण्यात आल्याने सहस्रोच्या संख्येने पक्षी रस्त्यावर मरून पडल्याच्या घटनेला ४ दिवस झाले असतांनाच भारतातील काही राज्यांमध्येही अचानक पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत.