परदेशातील पक्ष्यांमुळे परभणी येथे ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव ! – प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय 

स्थलांतरित परदेशी पक्षी

नांदेड – हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश यांच्यानंतर राज्यातही ‘बर्ड फ्ल्यू’चा धोका वाढला आहे. परभणीतील मुरुंबा गावात ८०० कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा अहवाल ‘बर्ड फ्ल्यू’ ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. मराठवाड्यात जायकवाडीसह अनेक पाणथळ जागा आहेत. तेथे स्थलांतरित परदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात.

प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय

मुरुंबा गावापासून दोन ते अडीच किमी अंतरावर असलेल्या रहाटी बंधार्‍यावर येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांनी ‘बर्ड फ्ल्यू’ येथे आणल्याचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील पशूवैद्यकीय आणि पशूविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला आहे.