देशविरोधी उग्रवादी, आतंकवादी यांना लगाम घालणारे मुत्सद्दी अधिकारी : लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) !
पुणे येथील लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) (वय ८२ वर्षे) हे एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते आहेत. आजही ते विविध विश्वविद्यालयांमध्ये अध्यक्षपदांवर असून ते युवकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.