US Rejects Claim Of Summons On Ajit Doval : अमेरिकेचा नागरिक असणारा खलिस्तानी आतंकवादी पन्नू याचा दावा अमेरिकी न्यायालयाने फेटाळला !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमेरिकेने समन्स बजावल्याचा केला होता दावा !

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू

वॉशिंग्टन (अमेरिका) – गेल्या फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टन दौर्‍याच्या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना कोणतेही न्यायालयीन कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत, असे अमेरिकेच्या एका न्यायालयाने स्पष्ट केले आहे. डोवाल यांना समन्स आणि अन्य न्यायालयीन कागदपत्रे बजावण्यात आली, असा दावा अमेरिकेचा नागरिक असणारा खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने केला होता.

पन्नू याने डोवाल आणि आणखी एक भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्याविरुद्ध दिवाणी खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. अमेरिकेच्या भूमीवर पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात गुप्ता यांनी भारतीय सरकारी कर्मचार्‍यासमवेत काम केल्याचा आरोप सरकारी अधिवक्त्यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या विरोधात हिंसक कारवाया करणारा पन्नू अद्याप बाहेर कसा ? अमेरिका त्याला अटक करून भारताच्या कह्यात का देत नाही ? जगभरातील आतंकवादाच्या विरोधात असणारा अमेरिका भारताच्या विरोधात असणार्‍या खलिस्तानी आतंकवादाला खतपाणी घालत आहे, हे लक्षात घ्या !