Pakistan Army Crosses LOC Opens Fire : पाक सैन्याकडून भारतीय सीमेत घुसखोरी करत गोळीबार : भारताने दिले प्रत्युत्तर

पुंछ (जम्मू-काश्मीर) – येथे पाकच्या सैन्याने घुसखोरी करण्याचा, तसेच भारतीय सैन्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्याने जशास तसे प्रत्युत्तर दिले.

१. एक एप्रिल या दिवशी येथील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीमुळे भूसुरुंगाचा स्फोट झाला. यानंतर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.  दोन्ही बाजूंमधील स्फोट आणि गोळीबार यात पाकचे ५ सैनिक घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे.

२. जम्मूस्थित संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल सुनील बटवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. आमच्या सैनिकांनी नियंत्रित आणि संतुलित पद्धतीने प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

संपादकीय भूमिका

पाकसमवेत शस्त्रसंधी करून काही उपयोग नाही, तर त्याला शस्त्रांच्या भाषेतच प्रत्युत्तर दिले पाहिजे !