वर्ष २०२५ मधील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याविषयी श्री. राम होनप यांना देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान !
१२ पूर्ण कुंभमेळ्यांनंतर १४४ वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. तेथे गंगा आणि यमुना या नद्या आहेत, तसेच पौराणिक कथेनुसार ‘सरस्वती नदीही तेथे येते’, असे मानले जाते. या तीन नद्यांच्या संगमामुळे प्रयागराजला ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. ‘या महाकुंभमेळ्यात सूक्ष्मातून काय घडते ?’, याचे मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे.