१३ जानेवारीपासून भारतातील तीर्थराज प्रयाग (उत्तरप्रदेश) येथे चालू झालेल्या महाकुंभमेळ्याच्या संदर्भात मला काही प्रश्न पडले. त्यानंतर शिवाच्या जटेमधून वहाणार्या गंगेच्या प्रवाहातील एक लहानसा प्रवाह सहस्रारावाटे माझ्या देहात गेला. त्यानंतर मला प्रश्नांच्या संदर्भात सुचलेली ज्ञानसूत्रे ७ फेब्रुवारीला पाहिली. आज पुढील भाग पाहूया. (भाग २)
या लेखातील भाग १ पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/882205.html
५. प्रश्न क्र. ५. कुंभमेळ्याच्या ठिकाणी साधना केल्याचे काय परिणाम होतात ?
५ अ. उत्तर : कुंभक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी साधना केल्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभच होतो.
५ अ १. कुंभमेळ्याच्या ठिकाणी विविध योगमार्गांनुसार साधना करणार्या साधकांना होणार्या आध्यात्मिक लाभाचे स्वरूप आणि प्रमाण
टीप – केवळ गुरुकृपायोगाच्या अंतर्गत साधकांना व्यष्टी साधनेसह काळानुसार आवश्यक असणारी समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रसार आणि अध्यात्मप्रसार करण्याची समष्टी सेवा करण्यास शिकवले जाते. त्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने सर्वाधिक, म्हणजे १०० टक्के लाभ होतो.

५ अ २. कुंभमेळ्याच्या ठिकाणी आध्यात्मिक पातळीनुसार साधकांना होणारा लाभ
टीप १ – प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान
टीप २ – नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय
टीप ३ – नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान
टीप ४ – मुख, २ हात, २ पाय, लिंग आणि गुद
टीप ५ – व्यक्तीच्या भावानुसार त्याला मिळणार्या लाभाचे प्रमाण न्यून-अधिक होते.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २९.१.२०२५) (क्रमश:)
या लेखाचा यापुढील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/882868.html
|