सिक्कीममध्ये ढगफुटी : तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे हाहा:कार !

सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्‍यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.

‘भारतीय वायू सेना’दिनानिमित्त सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्‍कार !

९१ व्‍या ‘भारतीय वायू सेना’दिना निमित्त ‘डिफेन्‍स फोर्स लीग’कडून आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात ‘परमवीर चक्र’ पुरस्‍काराने सन्‍मानित सुभेदार मेजर संजय कुमार यांचा सत्‍कार करण्‍यात आला.

मालदीवमधून भारतीय सैनिकांना हटवले जाईल !

मालदीवचे राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर चीन समर्थक महंमद मुइज्जू यांची घोषणा !

सैन्यदलांच्या अग्नीवीर भरती योजनेत मोठे पालट होण्याची शक्यता !

भारत शासनाने गेल्या वर्षी सशस्त्र दलांत भरती होण्यासाठी ‘अग्नीवीर’ नावाची योजना कार्यान्वित केली होती. या योजनेला तेव्हा मोठा विरोध झाला होता. या विरोधाला झुगारून सरकारने ही योजना लागू केली.

पंजाबमध्ये पाकमधून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेले साडेतीन कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त !

पाकिस्तानच्या एका ड्रोनने पंजाबमध्ये घुसखोरी केल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पंजाब पोलिसांच्या सहकार्याने त्याचा शोध घेऊन हे ड्रोन कह्यात घेतले. या ड्रोनमध्ये हेरॉईन ठेवण्यात आले होते.

युक्रेन-रशिया युद्धात गुप्तपणे शस्त्रे पुरवल्याने पाकला मिळाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून साहाय्यता निधी !

‘रशियाशी लढण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे शस्त्रे पुरवली होती. युद्धाच्या काळात युक्रेनच्या सैन्याने त्यांचा वापर केला यातून रशिया – युक्रेन युद्धात पाकिस्तानचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येते.

पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवरील सैन्य तळांजवळ जमवले आतंकवादी !

काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.

मणीपूरमध्ये सुटीवर असलेल्या सैनिकाची डोक्यात गोळी घालून हत्या !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३ सशस्त्र आक्रमणकर्त्यांनी सेर्टो थांगथांग कोम यांच्या घरात घुसून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली.

अनंतनागमध्ये अद्यापही चकमक चालूच !

चकमकीत भारतीय सैन्याचे एक कर्नल आणि मेजर, तर जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक उपायुक्त वीरगतीला प्राप्त झाले आहेत. यासह २ सैनिकांनाही वीरमरण आले आहे.

सीमावर्ती भागांत श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्याची सैनिकांची इच्छा

‘दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट’कडून मराठा बटालियनच्या सैनिकांकडे गणरायाची मूर्ती सुपुर्द ! देशाच्या सर्वच सीमावर्ती भागांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न करावा !