गाझामधील नरसंहाराविषयी इस्रायली सैन्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत ! – अमेरिका

अमेरिकेचे संरक्षण सचिव ऑस्टिन

वॉशिंग्टन (अमेरिका) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता अर्धे वर्ष उलटले आहे. अशातच अमेरिकेने इस्रायलवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून केल्या जात असलेल्या टीकेला विरोध केला आहे. इस्रायलकडून गाझामध्ये चालू असलेल्या कथित नरसंहाराचा कोणताही पुरावा नाही, असे स्पष्ट वक्तव्य अमेरिकेचे संरक्षण सचिव ऑस्टिन यांनी केले. दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय इस्रायलवर केलेल्या आक्रमणासाठी हमासला उत्तरदायी धरण्यात अपयशी ठरल्याची टीका केली.

सौजन्य Breaking Points

डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदार एलिझाबेथ वॉरन यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत म्हटले होते की, गाझा युद्धासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला नरसंहारासाठी दोषी ठरवले पाहिजे; कारण त्याच्या विरोधात‘पुरेसे पुरावे’ आहेत. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे संरक्षण सचिव आणि परराष्ट्रमंत्री यांनी इस्रायलच्या बाजूने केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.