रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानात ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जागृती  !

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र प्रसार अभियानांतर्गत’ रायगड जिल्ह्यातील आमदार, अधिवक्ता, उद्योजक आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटी घेतल्या, बैठका घेतल्या त्याचा थोडक्यात वृत्तांत . . .

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : २.१.२०२२

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. हिंदूंनी जागृत राहून या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’

‘प्रत्येक दंगलखोर हा मुसलमानच असतो’ असे साम्यवादी नेत्या कविता कृष्णन् यांचे अप्रत्यक्ष कथन !

हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत कथित रूपाने मुसलमानविरोधी वक्तव्ये करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात आकाशपाताळ एक करणारे आता कविता कृष्णन् यांच्या विरोधात चकार शब्दही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचण्यासाठी काँग्रेसचा दबाव !

एकीकडे ‘आतंकवादाला धर्म नसतो’ असे म्हणणार्‍या आणि दुसरीकडे ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनो, जाब विचारा !

प.पू. कालीचरण महाराज यांच्यासह ६ जणांवर पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

ठाणे येथील पोलीस ठाण्यात प.पू. कालीचरण महाराज यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांची तक्रार !

हिंदी चित्रपट ‘अतरंगी रे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन

हिंदी चित्रपटांमध्ये आणि मुसलमान अभिनेत्यांनी हिंदु अभिनेत्रींशी विवाह केल्याच्या घटनांमुळेच देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना प्रोत्साहन मिळू लागले आहे. ‘लव्ह जिहाद’ला रोखायचे असेल, तर प्रथम हिंदी चित्रपटसृष्टीवर चाप बसवणे आवश्यक आहे !

विधानसभेत हिंदुहिताच्या गोष्टींची चर्चा केव्हा होणार ? – ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

महाराष्ट्र ही संतांची भूमी असली, तरी विधानसभेत हिंदुविरोधी विधाने आणि कृती होत असल्याचे दिसून येते, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून कर्नाटक शासनाचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस कर्नाटकात भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !