भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदु निर्वासितांना १० वर्षांनी वीजपुरवठा

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – पाकिस्तानातील धर्मांधांच्या अत्याचाराला कंटाळून भारतात आलेले हिंदु निर्वासित येथील झोपड्यांमध्ये वास्तव्य करत आहेत. या झोपड्यांमध्ये मागील १० वर्षे वीजपुरवठा नाही. मागील मासात न्यायालयाच्या आदेशाने या निर्वासितांना वीजजोडणी करण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार देहलीतील ‘मजलिस पार्क मेट्रो स्टेशन’च्या मागे असलेल्या एका मोकळ्या मैदानात जवळपास ९०० हिंदु निर्वासित १० वर्षांपासून नरकमय जीवन जगत आहेत. त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. देहली उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ‘टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेड’ला सर्व निर्वासितांच्या घरांना एका मासाच्या आत वीजपुरवठा करण्याचा आदेश दिला होता.

वर्ष २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये रहाणारे हिंदू मोठ्या संख्येने भारतात स्थलांतरित झाले होते. या निर्वासितांसाठी भारतीय नागरिकत्व आणि मतदानाचा हक्क अजूनही एक स्वप्नच आहे.

संपादकीय भूमिका

  • केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ? भारत सरकारने याकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक !