छत्रपती संभाजीनगर येथे मतदान केंद्रावर प्रशासनाचा ढिसाळ कारभार !

(‘व्हीलचेअर’ म्हणजे चाकांची आसंदी)
छत्रपती संभाजीनगर (वार्ताहर) – छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी येथील पंचायत समिती इमारतीमधील मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ आणि दायित्वशून्य कारभार समोर आला. मतदानासाठी आलेल्या भाजपच्या आजारी नगरसेविका सत्यभामा शिंदे यांना चालता येत नसतांनाही केंद्र परिसरात ‘व्हीलचेअर’ची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती. अंततः उपस्थित भाजपचे प्रवक्ते तथा नगरसेवक प्रमोद राठोड आणि इतर सहकारी यांनी त्यांना आसंदीवर उचलून मतदान केंद्रात नेले. या दुरवस्थेचा जाब विचारणार्या लोकप्रतिनिधींचा पोलिसांशी वाद झाला.
नगरसेवक प्रमोद राठोड यांनी आरोप केला आहे की, सुविधांच्या अभावाचा जाब विचारला असता अधिकार्यांनी चुकीच्या भाषेचा वापर करून आमचा अवमान केला आहे. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार करणार आहोत. या गंभीर प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकारी सविता चौधर यांनी स्वतःचा बचाव करत दावा केला की, मतदान केंद्रावर सर्व सोयी उपलब्ध होत्या. वैद्यकीय सुविधेची आधी कोणतीही मागणी नोंदवली नव्हती. आमचे कर्मचारी सुविधा देईपर्यंत त्यांनी थांबणे आवश्यक होते.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर