हिंदुविरोधी भूमिका घेणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची सूची गृहमंत्र्यांना देणार ! – नितेश राणे

नितेश राणे

सातारा, १४ डिसेंबर (वार्ता.) – लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांसारख्या प्रकरणात सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी दुर्लक्ष करत हिंदुविरोधी भूमिका घेत आहेत. अशा अधिकार्‍यांची सूची करण्यात आली असून लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.

सातारा येथील विश्रामगृहामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की,

१. पाटण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. अत्याचार करणार्‍या प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यासाठी हिंदु जनआक्रोश मार्चा काढण्यात आला.

२. पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आहेत. आम्ही त्यांना भेटून धीर दिला. अजूनही मुलीला शाळेत जाण्यास भीती वाटत आहे.

३. श्रद्धा वालकर हिची हत्या करून ३५ तुकडे करण्यात आले होते. असे प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडू नयेत, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

४. असे प्रकार करणार्‍या प्रवृत्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे; मात्र पोलीस अधिकारी हिंदूंवरील अत्याचार थांबवत नाहीत. त्यामुळे जिहादी मानसिकता वाढू लागली आहे.

५. जिल्ह्यातील सातारा, फलटण, पाचगणी आणि महाबळेश्वर येथील काही पोलीस अधिकार्‍यांची सूची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे.

६. लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदु मुलींना लक्ष केले जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी कायदा महाराष्ट्रात लवकरच आणण्याविषयी शिंदे-फडणवीस सरकार विचार करत आहे.