धर्माभिमानी नागरिकांनी मागणी केल्याचे प्रकरण

(‘चिकन शॉप’- कोंबड्यांच्या मांसविक्रीचे दुकान)
फोंडा, १९ जून – फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील चिकन शॉपला फोंडा नगरपालिकेने १९ जून या दिवशी टाळे ठोकले आहे. भाजीची विक्री होत असलेल्या ठिकाणीच चिकन शॉप होते. नियमबाह्यरित्या उभारलेले चिकन शॉप हटवून ते चिकन बाजारात स्थलांतरित करावे, अशी मागणी फोंडा येथील धर्माभिमानी नागरिकांनी फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि फोंडा नगरपालिका यांच्याकडे यापूर्वी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर फोंडा नगरपालिकेने ही कारवाई केली आहे. फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष श्री. वीरेंद्र ढवळीकर यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नगरपालिकेच्या भाजी बाजारात भाजी खरेदी करतांना ग्राहकांना ‘चिकन शॉप’ची दुर्गंधी सहन करावी लागत होती. याचा भाजी विक्रीवरही परिणाम होत होता, तसेच ‘भारतीय न्याय संहिते’चे कलम २९२ अंतर्गत ‘चिकन शॉप’ भाजीची विक्री होत असलेल्या ठिकाणी असणे नियमबाह्य आहे, तसेच स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर भाजी विक्री आणि चिकन यांसाठी निरनिराळा विभाग असावा, असा नियम आहे. चिकन शॉपमुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि दुकानात निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ यांमुळे सार्वजनिक स्वच्छता धोक्यात येत होती. यासाठी फोंडा नगरपालिकेने चिकन, मासळी आणि भाजी यांच्यासाठी निरनिराळे विभाग केलेले आहेत.
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
गोव्यात पाणीटंचाईचे कोणतेही संकट नाही !