
सांगली – ग्रामीण भागांतील गरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याऐवजी आपल्या कर्तव्यात घोर निष्काळजीपणा आणि कसूर करणार्या जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती ऋषिकेश लाड यांनी दिलेल्या आदेशानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी ही कारवाई केली.
जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पहाणी केली. या वेळी पलूस तालुक्यातील कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सानिका चव्हाण, डॉ. अंजली शिंदे आणि वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील किनरे हे विनाअनुमती अनुपस्थित होते. याविषयी त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश दिला.
तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग सोनवले आणि डॉ. शुभांगी घोळवे हे शासनाचा भत्ता उचलूनही मुख्यालयी रहात नाहीत. त्यामुळे त्यांचा घरभाडे भत्ता तात्काळ बंद करण्याची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती शेळके यांच्या कामकाजाविषयी रुग्ण आणि नागरिक यांच्या अनेक गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या निष्काळजीपणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार त्यांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. यापूर्वीही त्यांच्या खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव देण्यात आला होता.
| ‘जनतेच्या आरोग्याशी निगडीत गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना तत्पर सेवा द्यावी, अन्यथा यापुढील कारवाई अधिक कठोर असेल’, अशी चेतावणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली असून या कारवाईला सभापती ऋषिकेश लाड आणि आरोग्य समिती सदस्य यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. |
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !