
पुणे – आषाढी वारीत सहभागी होणार्या सहस्रो महिला वारकर्यांसाठी यंदा प्रथमच प्रत्येक पालखीतळावर जर्मन हँगर्स (निवारा शेड) उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी महिलांसाठी स्नानगृहे, स्वच्छतागृहे, कपडे पालटण्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती’च्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांनी वारकरी महामंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. त्यास तात्काळ मान्यता देण्यात आली.

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सामाजिक न्याय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे आषाढी वारीत सहभागी होणार्या महिला वारकर्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या गैरसोयी दूर होण्यास साहाय्य होणार आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !