
पुणे – पाऊस लांबल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणार्या धरणामध्ये पाणीसाठा न्यून राहिला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो; मात्र महापालिकेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पाणी न येणे, गढूळ पाणी येणे, अल्पकाळासाठी पाणी येणे यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर त्यांच्या भागांतील समस्या मांडल्या; मात्र कोंढव्यातील शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी कोंढव्यातील पाणीटंचाईची समस्या मांडतांनाच बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेने कारवाई केल्याचे सूत्र उपस्थित केले. यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नगरसेवक समोरासमोर आले.
विरोधक गोंधळ घालत असतांना महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. सर्वसाधारण सभेत झालेल्या या प्रकाराच्या विरोधात विरोधी पक्षाचे नगरसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार असल्याची चेतावणी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. विरोधी नगरसेवकाचा मुद्दा पटला नाही, तर जागेवर थांबून त्यास विरोध करावा. महापालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांनी शिस्तीत वागावे. आयुक्तांकडून पाणीटंचाई संदर्भात खुलासा होणार होता; मात्र तो होऊ शकला नाही याचे वाईट वाटते, असे महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.
मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी भिवंडी येथील संपादक डॉ. किशोर पाटील यांची निवड