
सोलापूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि पालखी मार्ग परिसर ड्रोनमुक्त घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात अपर जिल्हादंडाधिकारी अभिजित पाटील यांनी अधिसूचना लागू केली आहे. ड्रोनबंदी ८ जूनपासून पुढील ६० दिवस लागू रहाणार आहे. या वेळी आषाढी वारी १९ ते २९ जुलै या कालावधीत होत असून २५ जुलै या दिवशी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. यात्रेच्या वेळी लाखो भाविक पंढरपुरात येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिसूचनेनुसार सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील (पोलीस आयुक्तालय क्षेत्र वगळून) सर्व नगरपालिका क्षेत्र, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, तसेच सर्व पालखी मार्गांवर ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !