१५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक चालू !
नवी मुंबई – नवी मुंबई विमानतळावरून १५ जुलैपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक चालू होणार आहे, अशी माहिती ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड’चे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) बी.व्ही.जे.के. शर्मा यांनी दिली आहे. हळूहळू मालवाहतुकीच्या प्रमाणात वाढ करण्याचे विमानतळाचे उद्दिष्ट आहे.
ठाणे ते नवी मुंबई प्रवास काही मिनिटांत
मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कोपरी (ठाणे) ते पटनी मार्ग (नवी मुंबई) येथील खाडीवर ६ पदरी पूल उभारणार आहे. यामुळे ठाणे ते नवी मुंबई या प्रवासाचा ३० ते ४५ मिनिटांचा प्रवासाचा वेळ न्यून होईल.
अवैध ॲलोपॅथिक औषधविक्री उघड !
मुंबई – गोवंडी परिसरातील बालरोगतज्ञाच्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून परवान्याविना चालू असलेली ॲलोपॅथिक औषधविक्री उघडकीस आणली. या वेळी ९ लाख ९ सहस्र रुपयांचा औषधसाठा आणि देयक पुस्तक जप्त करण्यात आले.
संपादकीय भूमिका : अशा रुग्णालयांवर बंदीच हवी !
‘बेस्ट’चा संप !

मुंबई – बेस्ट सेवा १८ जूनच्या मध्यरात्रीपासून ठप्प झाली आहे. बेस्ट कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी ‘बेस्ट कृती समिती’ने संप पुकारला. २ सहस्र ७६६ पैकी केवळ ३२ बसच धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
वस्तू आणि सेवा कर विभागातील लाचखोर निरीक्षक अटकेत !
मुंबई – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागातील निरीक्षक संदीप खलाटे याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली. वस्तू आणि सेवा कर नोंदणी क्रमांक देण्यासाठी त्याने लाच घेतली होती.
संपादकीय भूमिका : अशांना बडतर्फच करायला हवे !
२० अमली पदार्थ माफिया अटकेत !

मुंबई – मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी मुंबई, गुजरात, तेलंगाणा आणि उत्तरप्रदेश येथपर्यंत पसरलेल्या आंतरराष्ट्रीय जाळ्यातील २० अमली पदार्थ माफियांना अटक केली. या मोहिमेत २२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे मॅफेड्रोन आणि अन्य घातक रसायने कह्यात घेण्यात आली.
संपादकीय भूमिका : अमली पदार्थ माफियांवर कोणती कारवाई झाली, हे जनतेला समजायला हवे !

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास १५ ऑगस्टनंतर अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांवर कारवाई !
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी भिवंडी येथील संपादक डॉ. किशोर पाटील यांची निवड