
मुंबई – राज्यातील अमराठी रिक्शा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, तसेच प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व्हावा, यासाठी परिवहन विभागाने धोरणात्मक अन् ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सर्व अमराठी रिक्शा-टॅक्सी चालकांना ४ घंट्यांचा ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. १५ ऑगस्टनंतर प्रमाणपत्र नसलेल्या चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे परिवहन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०६.२०२६)
पार्थ रुग्णालयाच्या आधुनिक वैद्या संगीता गायकवाड यांना अटक
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षेसाठीही कठोर निर्बंध !
सनदी लेखापाल परीक्षेत सोहम मांजरेकर आणि श्रेयश शिंदे यांचे दैदीप्यमान यश !
‘इंडियाज प्राईड अवॉर्ड २०२६’साठी भिवंडी येथील संपादक डॉ. किशोर पाटील यांची निवड