आसाम मिनरल्स नागपूर खाण आस्थापनाच्या ५ कामगारांवर गुन्हा नोंद

वेंगुर्ला – तालुक्यातील आसोली न्हैचिआड सड्यावर सामायिक मालकीच्या भूमीमध्ये खाण प्रकल्पासाठी माती परीक्षण करण्यासाठी आलेल्या ‘आसाम मिनरल्स नागपूर’ या आस्थापनाच्या ५ कामगारांना नागरिकांनी काम करतांना प्रत्यक्ष पकडले आणि अनधिकृतरित्या करत असलेल्या या माती परीक्षणाविषयी खडसावले अन् त्यांना वेंगुर्ले पोलिसांच्या कह्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणी ५ कामगारांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. आजगाव येथे खाणविरोधी आंदोलन चालू असतांनाच हा प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ही घटना १८ जून या दिवशी सकाळी घडली.
न्हैचिआड, सडा येथे अनोळखी ५ माणसे भूमीत खड्डे खोदून काहीतरी काम करत होते. या भागातील एका ग्रामस्थाला हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सदस्य संकेत धुरी यांना याची माहिती दिली. त्यानंतर धुरी हे ग्रामस्थांसह तात्काळ घटनास्थळी आले. तेथे काम करत असलेल्या कामगारांना काम करण्याची लेखी अनुमती आहे का ? असे विचारले; मात्र त्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नव्हती. त्यामुळे संशय आल्याने ग्रामस्थांनी खाणविरोधी कृती समितीला याची माहिती दिल्यानंतर येथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले.
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश गडदेकडून २ गावठी पिस्तूल जप्त !
व्हीलचेअरअभावी आजारी महिला नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की !