सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – वर्ष २०२० ते २०२५ या कालावधीत होणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्यशासनाच्या ग्रामविकास विभागाने मुंबई ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २-अ(१)(२) नुसार पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित केले आहे. त्यानुसार तालुक्यांसाठीचा सरपंचपदासाठी आरक्षणाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. ही सरपंचाची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहीत पद्धतीने निश्चित करण्यासाठी सरपंच आरक्षण सोडत १६ डिसेंबर २०२० या दिवशी सकाळी ११ वाजता तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी सार्वजनिक आरोग्य विभाग, मदत आणि पुनर्वसन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सूचना आणि आदर्श कार्यप्रणाली संहिता या गोष्टी विचारात घेऊन कार्यवाही करावी, असे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांनी कळवले आहे.