भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगाली अभिनेत्री सयानी घोष यांच्याविरोधात तक्रार

बंगाली चित्रपट अभिनेत्री सयानी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हिंसाग्रस्त महिलांना आधार देण्यासाठी ‘वन स्टॉप सेंटर’ची स्थापना

शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेस बळी पडलेल्या महिलेस आधार देऊन त्यांना कायदेविषयक, समुपदेशन, वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवणे आणि दिलासा देणे, हा या योजनेचा उद्देश आहे

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या विरोधात २६ जानेवारीला आंदोलन करण्याची चेतावणी

सिंधुदुर्ग जिल्हा नगररचना विभागात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यानेच भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते डी.के. सावंत यांनी प्रशासनाला दिली आहे.

‘गोवा लोकायुक्तां’च्या नियुक्तीस उच्च न्यायालयाकडून आणखी २ मासांचा अवधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘गोवा लोकायुक्तां’चे रिक्त पद भरण्यासाठी गोवा शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.  

चाफळ (जिल्हा सातारा) येथे अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी मोठी कारवाई

चाफळ येथील माथणेवाडी रस्त्यावर अनधिकृतपणे मुरुम उत्खनन चालू होते. ही माहिती मिळाल्यावर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत १० ब्रास मुरुम, १ जेसीबी आणि ४ ट्रॅक्टर कह्यात घेत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला.

किरीट सोमय्यांना जिवे मारण्याची धमकी

‘‘सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या’’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोमय्या यांनी दिली.

सरपंचपदाचे आरक्षण एक मासात काढणार – ग्रामविकास मंत्री

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे – मंत्री हसन मुश्रीफ

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आणखी एका मंदिरांवर आक्रमण होण्याची शक्यता ! – हिंदु नेत्याची भीती

पाकमधील हिंदू आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित ! हवेलियन नगर येथे असलेल्या एका प्राचीन मंदिराला धोका आहे. या मंदिराच्या परिसरात एक अन्य प्राचीन ढाचा आहे. भू माफिया हा ढाचा तोडण्याची शक्यता आहे.

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’च्या प्रमुखांसह ‘तांडव’चे निर्माता-दिग्दर्शक, लेखक आदींविरुद्ध गुन्हे नोंद

केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे !

तिरुनेलवेली (तमिळनाडू) येथील मंदिराच्या भूमीवर अवैधरित्या बांधलेली ख्रिस्ती दफनभूमी हालवण्यात येणार !

हिंदूंच्या विरोधाचा परिणाम ! प्रत्येक न्यायहक्कांसाठी हिंदूंनी आवाज उठवल्यावर प्रशासन आणि राज्य सरकारे यांना जाग येते, असाच आतापर्यंतचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !