
पणजी, १९ जानेवारी (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ‘गोवा लोकायुक्तां’चे रिक्त पद भरण्यासाठी गोवा शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.
याचिकादार आयरिश रॉड्रिग्स यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर प्रथम सुनावणी २३ सप्टेंबर या दिवशी झाली आणि या वेळी उच्च न्यायालयाने शासनाला ‘गोवा लोकायुक्त’ हे रिक्त पद भरण्यासाठी ३ मासांचा कालावधी दिला होता. हा कालावधी २३ डिसेंबर या दिवशी संपला. शासनाने या प्रकरणी रिक्त पद भरण्यासाठी न्यायालयाकडे आणखी ३ मासांचा कालावधी देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांसह अनेक शासकीय अधिकारी कोरोनाबाधित झाले असल्याने शासनाने रिक्त पद भरण्यासाठी आणखी कालावधी देण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी निवाडा देतांना रिक्त पद भरण्यासाठी शासनाला आणखी २ मासांचा अवधी दिला आहे.
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
बोधगया येथे महाराष्ट्र्राच्या यात्रेकरूंना मिळणार कायमस्वरूपी निवास सुविधा ! – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
सार्वजनिक ठिकाणी कचरा करण्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा !