भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी बंगाली अभिनेत्री सयानी घोष यांच्याविरोधात तक्रार

शिवलिंगाला एक महिला निरोध घालत असल्याचे चित्र पोस्ट केल्याच्या चित्राचे प्रकरण

मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांची सायबर पोलिसांकडे तक्रार

कोलकाता (बंगाल) – बंगाली चित्रपट अभिनेत्री सयानी घोष यांनी भगवान शिवाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

१. सयानी घोष यांनी १८ फेब्रुवारी २०१५ मध्ये सामाजिक माध्यमांतून एक चित्र पोस्ट केले होते. यात एक महिला शिवलिंगाला निरोध घालत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्या चित्राच्या खाली लिहिण्यात आले होते, ‘देव आता आणखी उपकारी होऊ शकत नाही.’ सयानी यांच्याविरोधात यापूर्वी आसामची राजधानी गोहत्ती येथेही तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मेघालयाचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी सायबर पोलिसांकडे केलेली तक्रार

( सौजन्य : Script Baaz )

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

२. वर्ष २०१५ मध्ये या चित्रावरून वाद झाल्यावर सयानी यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले होते की, माझे ट्विटर खाते हॅक करून हे चित्र पोस्ट करण्यात आले आहे. मी यास विरोध करत आहे.