किरीट सोमय्यांना जिवे मारण्याची धमकी

किरीट सोमय्या

मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांना काही जणांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. बलात्काराचा आरोप झालेले सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून सोमय्या पाठपुरावा करत आहेत. पोलिसांत याविषयी माहिती देऊनही पोलीस यंत्रणांनी या प्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात केली नसल्याचे सांगून सोमय्या यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली की, महेश गिते, जयकांत राख, अक्षय तिडके, राम डोईफोडे, रमेश नागरगोजे यांच्याकडून ही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोन दिवसांत ६ वेळा धमक्यांचे दूरभाष आले आहेत. ‘‘सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालणार सोमय्या’’ अशा शब्दांत धमकावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सोमय्या यांनी दिली.