सरपंचपदाचे आरक्षण एक मासात काढणार – ग्रामविकास मंत्री

हसन मुश्रीफ

मुंबई – सरपंचपदाचे आरक्षण एक मासात काढणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. याआधी ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वीच सरपंचपदाची सोडत घोषित होत होती. आठ जिल्ह्यांमध्ये तशी सोडत घोषितही झाली होती; मात्र सरपंचपदासाठी होणारा घोडेबाजार आणि खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे १४ सहस्र ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जानेवारीमध्ये काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले होते.

कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित विविध मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणे ग्रामसभांचे आयोजन करण्यास संमती देण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.