मशिदींवरील भोंगे बंद करा, अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरून प्रतिदिन हनुमान चालिसा आणि आरती करावी लागेल ! – आमदार प्रसाद लाड, भाजप

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही ध्वनीप्रदूषण करणारे मशिदींवरील भोंगे बंद केले जात नाहीत. त्यामुळे शासनाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे निर्देश द्यावेत.

सोलापूर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’अंतर्गतचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जुलै २०२३ अखेर १६ सहस्र ९१ नळजोडण्या झालेल्या आहेत. डिसेंबर २०२३ पर्यंत ८५५ पाणीपुरवठा योजनांतील नळजोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

‘म्हादई’चे पाणी वळवण्याचे प्रकरण आणि ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ घोषित करणे, ही सूत्रे एकमेकांना जोडू नका ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

म्हादई अभयारण्य ‘व्याघ्र संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्यास म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवता येणार नसल्याचा विरोधी गटातील सदस्यांचा दावा होता. या पार्श्वभूमीवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे आवाहन केले.

आतंकवादाचे नवे स्‍वरूप !

जिहादी भारताला ‘गजवा-ए-हिंद’ करण्‍यासाठी ते वेगवेगळी षड्‍यंत्रे आखत आहेत आणि दुर्दैवाने त्‍यात ते यशस्‍वीही होत आहेत. त्‍यामुळे हिंदूंचे भवितव्‍य धोक्‍यात आहे. त्‍यांना ना पोलीस वाचवू शकतात, ना प्रशासन, ना राजकारणी. नूंहसारख्‍या घटना अशाच घडत राहिल्‍या, तर हिंदू अल्‍पसंख्‍य व्‍हायला वेळ लागणार नाही !

सदस्यांच्या वागण्यात सुधारणा होत नाही, तोपर्यंत लोकसभेचे कामकाज चालवण्यास नकार ! – लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

अशा निर्णयामुळे गदारोळ घालणार्‍या सदस्यांवर काहीही परिणाम होणार नाही. याऐवजी लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात गदारोळ करणार्‍या सदस्यांना संसदेबाहेर काढण्याचे, निलंबित करण्याचे आदी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

किश्तवाड (जम्मू) येथील सर्व मदरशांचे व्यवस्थापन सरकारच्या हाती देण्याचा निर्णय रहित !

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा निर्णय

सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक चालू 

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.

मणीपूर विषयावरून गोवा विधानसभेत  विरोधकांकडून पुन्हा गोंधळ

विरोधकांनी शून्य प्रहराच्या वेळी सभापतींच्या आसनासमोर जाऊन कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी ‘या प्रकरणी अगोदर सभापतींशी चर्चा करू’, असे आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी माघार घेतली आणि ते आसनस्थ झाले.

यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देऊ ! – सागर आमले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

प्रशासनाने वेळीच अशा गैरकृत्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा यापुढे ‘जशास-तसे’ प्रत्युत्तर देण्यात येईल, अशी चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाह श्री. सागर आमले यांनी दिली.