अंतराळ यानाला परमाणू ऊर्जेवर चालवण्याच्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’चे काम चालू !

इस्रोने परमाणू ऊर्जेवर काम करण्यास आरंभ केला आहे. यासाठी ‘इस्रो’ आणि ‘बार्क’ या संस्था ‘रेडियो थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर’ला विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोव्यात अल्प धोका असलेले १४ धबधबे पर्यटकांसाठी आजपासूनच खुले  !

ज्यात धबधबे, चिरेखाणी आणि अन्य ठिकाणी मिळून मागील सुमारे दीड मासांत २० जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर एका धबधब्याच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर शासनाने राज्यातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती.

बेंगळुरू (कर्नाटक) येथून ५ आतंकवाद्यांना अटक

सैयद सुहेल, उमर, जनिद, मुदासिर आणि जाहिद या सर्वांना कनकनगर येथील एका धार्मिक स्थळाजवळून मोठे षड्यंत्र रचत असतांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

रशियन सैनिक राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत !

रशियाच्या सैन्यातील बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. युद्धासाठी पुतिन यांच्या अवास्तव मागण्या, सैन्यातील अडथळे आणि रशियन संरक्षण मंत्रालयाची अकार्यक्षमता, याला कारणीभूत आहे.

मोगरा नाल्यावरील अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करू ! – उदय सामंत, उद्योग मंत्री

मोगरा नाल्याचे बांधकाम हे महानगरपालिकेने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले आहे. ते जर चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे, तर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर तसेच ठेकेदारांवर कारवाई करणार का ?

शिवभक्तांवर थुंकणार्‍या तिघांच्या घरावर चालवला बुलडोझर !

उज्जैन येथे भगवान महाकालच्या यात्रेच्या वेळी छतावरून यात्रेकरूंवर थुंकणार्‍या तिघांच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर चालवण्यात आला. १७ जुलै या दिवशी येथील खार कुआ भागात ही घटना घडली होती.

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस : चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 

वाशिष्ठीचे पाणी वाढले असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, तसेच पुरामुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या.

६ वर्षांत गोव्यातील ४५ सहस्र लोक दारिद्र्यरेषेबाहेर !

नीती आयोगाने नुकताच ‘राष्ट्रीय बहुआयामी गरिबी निर्देशांक : प्रगतीसंबंधी समीक्षा २०२३’ या नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

गोवा : आज प्रारंभ होणार्‍या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यकारी गटाच्या बैठकीत ६ प्राधान्ये

या चौथ्या बैठकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रीस्तरीय निवेदनाच्या मसुद्यावर होणारी सविस्तर चर्चा ही आहे. बैठकीला जोडूनच विविध अन्य कार्यक्रमांचे (साइड इव्हेंट्सचे) आयोजन करण्यात आले आहे.

अमेरिकेने १०५ प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या !

गेल्या वर्षी अमेरिकेने ३०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती भारताकडे सोपवल्या होत्या. अद्यापही अमेरिकेकडेे १ सहस्र ४०० हून अधिक प्राचीन भारतीय कलाकृती आहेत, त्या परत देण्यात आलेल्या नाहीत.