मुंडे प्रकरणात शरद पवार यांची भेट घेणार्‍या पोलीस अधिकार्‍याची हकालपट्टी करा ! – भातखळकर

पाठीमागून सूत्र हालवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी.

भुयारी रस्त्याचे होणार आता शासकीय उद्घाटन !

अनुमाने ७५ कोटी रुपये व्यय करून भुयारी रस्ता बांधण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ! – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांचा आरोप

शहरातील अनेक विकासकामे, गटारे, प्रवेशद्वार बांधणी यामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.

शासनाच्या सर्व विभागांत मराठीचा वापर व्हावा ! – सुभाष देसाई

मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची आवश्यकता असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ३१० रुग्णालयांचे फायर ऑडिट पूर्ण !

महापालिकेच्या पहाणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आढळून आली नाही तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल,

३१ जानेवारी पूर्वी लाभार्थी शिधापत्रिकेवरील सर्व व्यक्तींचे आधार सिडींग करण्यात येणार ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वार कुंभमेळ्यासाठीच्या आरोग्याविषयीच्या सिद्धतेविषयीचा अहवाल मागितला !  

असा अहवाल न्यायालयाला मागवावा लागतो, याचा अर्थ सरकार आणि प्रशासन निष्क्रीय आहेत, असाच होतो !

रामसेतूच्या संशोधनाला पुरातत्व विभागाची संमती !

इतकी वर्षे पुरातत्व विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? हिंदूंची ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे अन् वास्तू यांविषयी पुरातत्व विभाग नेहमीच निष्काळजी राहिला आहे. रामसेतूच्या संदर्भातही हेच दिसून येते !

नागपूर येथे नायलॉन मांजाने गळा कापल्याने तरुणाचा मृत्यू

नायलॉन मांजा वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

सरकारला ‘आयआयटी’ प्रकल्प सत्तरीत नको, तर तो कुडचडे येथे नेण्यास सिद्ध ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री, गोवा

सरकार शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प अन्यत्र स्थलांतर करू इच्छित असेल, तर कुडचडे मतदारसंघात ‘आयआयटी’ प्रकल्प स्थापण्यास मी इच्छुक आहे – कायदामंत्री नीलेश काब्राल