जालना येथे २ सहस्र रुपयांची लाच घेतांना पर्यवेक्षकाला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

३० सहस्र रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे पोलिसावर गुन्हा नोंद !

लाचखोर पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

५० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या आरे दुग्ध वसाहतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख १० सहस्र रुपयांची रोकड हस्तगत !

कोट्यवधी रुपये हडप करणार्‍या लाचखोरांची सर्व संपत्ती हस्तगत करावी ! लाचखोरांना कठोरात कठोर शासन झाल्यासच कुणी लाच मागण्याचे धाडस करणार नाही !

ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील लाचखोर महिला कार्यालय अधीक्षक आणि एक खासगी इसम कह्यात !

रिक्त असलेल्या अनुदानित शिक्षकाच्या जागेवर नेमणूक करण्याचा आदेश काढण्यासाठी तक्रारदारा कडे ७ लाख ५० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

राज्यात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्षभरात ३७६ आरोपींना अटक

पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

निवृत्त भूमी अभिलेख अधिकार्‍याकडे ८८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले.

राज्यात लाचलुचपत विभागाच्या कारवाईत वर्षभरात ३७६ आरोपींना अटक

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी ३३ टक्क्यांनी वाढलेली आहे. लाचखोरांच्या कारवाईत नेहमीच आघाडीवर असलेला पुणे विभाग यंदा तिसर्‍या स्थानावर आला आहे. त्यामुळे पुणे विभागात लाचखोरीच्या तक्रारी अल्प आल्या कि कारवाई करण्यात विभाग अल्प पडत आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ अभियंत्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

समाजाला धर्मशिक्षण नसल्याने ‘स्वार्थांधता हे पाप आहे’, ही जाणीव नागरिकांच्या मनात नाही. त्यामुळे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !

नवी मुंबई येथे लाच मागणार्‍या लेखाधिकार्‍यावर गुन्हा नोंद !

सेवापुस्तकात वेतन निश्चिती पडताळणी करून त्याची नोंद घेण्यासाठी एका कर्मचार्‍याकडे ४ सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या लेखाधिकार्‍यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.

नागपूर येथे ३ लाख रुपयांची लाच घेणार्‍या दोघांना अटक !

८० लाख रुपयांचा कर माफ करण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागणार्‍या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सूरज गणवीर आणि रवींद्र बागडे असे त्यांची नावे असून ते येथील महानगरपालिकेच्या आशी नगर झोन येथे कार्यरत आहेत