अशा लाचखोरांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना कारागृहातच डांबायला हवे !
मुंबई – मोनोरेलच्या कंत्राटदाराकडून २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोनोरेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एल्.एन्. मूर्ती यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे.
‘फॅसिलिटी मॅनेजमेंट’ या आस्थापनाला मुंबई मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत स्वच्छता, हाऊसकिपींग, देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. या कामाचे ४० लाख रुपयांचे देयक आणि ११ लाख गॅरेंटी रक्कम मुंबई मोनोरेलकडे थकीत होती. देयक संमत करण्यासाठी मूर्ती यांनी तक्रारदाराकडे २० लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदाराने तक्रार प्रविष्ट केल्यावर २ जुलै या दिवशी पोलिसांच्या पडताळणीत मूर्ती यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार या प्रकरणी मूर्ती यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.