महापालिकेचा उपअभियंता लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

भ्रष्टाचार करण्याची सवय लागलेला सरकारी विभाग कधी सुधारणार ? अशा लाचखोर अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांचे निलंबन करायला हवे. – संपादक 

पुणे – महापालिकेच्या शाळा दुरुस्तीचे देयक काढण्यासाठी महापालिकेच्या विठ्ठल सोनवणे या उपअभियंत्यांनी ४० सहस्र रुपयांची लाच घेतल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी वर्ष २०१८ – १९ मध्ये महापालिकेच्या शाळा दुरुस्तीचे काम केले होते. त्याचे पैसे मिळावेत यासाठी त्यांनी सोनवणेंकडे अर्ज केला होता. संबंधित कामाचे देयक मंजूर करण्यासाठी आणि दुसर्‍या कामाचे देयक काढल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून ४० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोनावणे यांना पकडले.