वसई (जिल्हा पालघर) येथील मिक्सरच्या कारखान्याला भीषण आग !

यामध्ये मिक्सर बनवण्यासाठी आणलेला सर्व कच्चा माल, तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाला दिल्यावर थोड्याच वेळात अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले.

भाजपच्‍या वतीने राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांचा निषेध !

कोल्‍हापूर दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक यांच्‍या नेतृत्‍वाखाली उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्‍याविषयी अवमानकारक व्‍यक्‍तव्‍य केल्‍याविषयी निषेध आंदोलन करण्‍यात आले.

विजय गुळवे यांची भाजपच्‍या करवीर दक्षिण मंडळ ‘युवा मोर्चा’पदी निवड !

उचगाव येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी श्री. विजय गुळवे यांची भाजपच्‍या करवीर दक्षिण मंडळ ‘युवा मोर्चा’पदी निवड करण्‍यात आली आहे.

अजित पवार यांच्यासह गेलेल्यांचा आता फेरविचार नाही ! – शरद पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

देहलीतील भाजप सरकार गेले, तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन क्षमा मागतील, या आमदारांमध्ये घालमेल चालू आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला होता.

मनोज जरांगे यांना मुंबईत मैदानाची अनुमती देऊ नये ! – अधिवक्ता गुणवंत सदावर्ते

व्यावसायिक आस्थापने सांकेतिक भाषेत बंद पाडली जाऊ शकतात. शाळा बंद पडतील, पोषण आहार थांबतील. त्यामुळे आझाद मैदान, बिकेसी, शिवाजी पार्क अशा कुठल्याच मैदानात मनोज जरांगे यांना मोर्चासाठी अनुमती देण्यात येऊ नये……

रोहा (रायगड) येथील एका घरात शस्त्रसाठ्यासह जनावरांची शिंगे सापडली !

कारवाईत ५ बंदुका, १ रिव्हॉल्वर, ३९ काडतुसे, ३ तलवारी, ५ लोखंडी काती, १ चॉपर, ५ चाकू, १ किलो वजनाच्या दारूगोळ्याची २४ पाकिटे, शिशाचे छोटे गोळे या शस्त्रांचा समावेश आहे.

कन्नडसक्तीच्या विरोधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन !

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी भाषेतील फलक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठी-कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास महाविद्यालय उत्तरदायी !

शैक्षणिक क्षेत्रातील प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार होणे, हे शिक्षण विभागाला लज्जास्पद !

नागपूरमधील शिवगर्जना ढोल-ताशा पथक अयोध्येत वादन करणार !

हे पथक २४ आणि २५ जानेवारी या दिवशी अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल-ताशा वादन करणार आहे. १११ वादक हे वादन करतील.

भाजपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी अवमानकारक व्यक्तव्य केल्याविषयी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या चित्रास कोल्हापुरी चपलेने मारण्यात आले.