अजित पवार यांच्यासह गेलेल्यांचा आता फेरविचार नाही ! – शरद पवार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

डावीकडून शरद पवार, अजित पवार

पुणे – अजित पवार आणि त्यांच्यासमवेत गेलेल्या लोकांविषयी आता फेरविचार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवसेंदिवस शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष टोकाला जातांना दिसून येत आहे.

देहलीतील भाजप सरकार गेले, तर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे येऊन क्षमा मागतील, या आमदारांमध्ये घालमेल चालू आहे, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी नुकताच केला होता. याविषयी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, आमदारांमध्ये घालमेल चालू आहे कि नाही मला माहीत नाही; पण असा निर्णय ज्यांनी घेतला आहे, त्यांच्याविषयी आमच्या पक्षात आता फेरविचार होणार नाही.