रोहा (रायगड) येथील एका घरात शस्त्रसाठ्यासह जनावरांची शिंगे सापडली !

मुंबई – रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धनगरआळी येथे एका घरामध्ये शस्त्रास्त्रांसह वन्यप्राण्यांची शिंगे सापडली आहेत. ८ जानेवारी या दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत ५ बंदुका, १ रिव्हॉल्वर, ३९ काडतुसे, ३ तलवारी, ५ लोखंडी काती, १ चॉपर, ५ चाकू, १ किलो वजनाच्या दारूगोळ्याची २४ पाकिटे, शिशाचे छोटे गोळे या शस्त्रांचा समावेश आहे. शिंगांमध्ये भेकराच्या शिंगांचे १४ जोड, सांबराच्या शिंगाचे ५, चौसिंगाच्या २, तर काळविटाच्या १ शिंगाचा जोड सापडला आहे.