नागपूर – येथील शिवगर्जना ढोल-ताशा पथकाला अयोध्या येथे मंदिराच्या परिसरात २२ जानेवारी या दिवशी ढोल-ताशा वादनाचा मान मिळाला आहे. हे पथक २४ आणि २५ जानेवारी या दिवशी अयोध्या भूमीत जाऊन तिथे ढोल-ताशा वादन करणार आहे. १११ वादक हे वादन करतील. राम धुन वादनाची खास सिद्धता पथकाकडून चालू करण्यात आली आहे. ४० ढोल, २० ते २५ ताशे, १० झांज आणि २१ ध्वज यांचा पथकात समावेश आहे.
श्रीरामाचे ३१ फुटांचे कटआऊट !
अयोध्या येथील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील हलबा समाज शिल्पकार असोसिएशनच्या वतीने भगवान श्रीरामाचे ३१ फूट उंचीचे कटआऊट सिद्ध केले जाणार आहे. त्याची उभारणी १५ जानेवारीपासून चालू होणार आहे. त्याची विधीवत् पूजा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे.