आध्यात्मिक उपाय करतांना आवरण काढणे आणि न्यास करणे, हे स्थुलातून शक्य नसल्यास सूक्ष्मातून करा !

काही वेळा व्यक्तीला अती थकव्यामुळे किंवा हात दुखत असल्यामुळे आवरण काढणे किंवा न्यास करणे शक्य होत नाही. प्रवास करतांना, एखाद्या कार्यालयात गेल्यावर तेथे नामजप करायला थोडा वेळ मिळाल्यास अशा ठिकाणीही आवरण काढणे आणि न्यास करणे बहुधा शक्य होत नाही. अशा वेळी सूक्ष्मातून आवरण काढावे आणि न्यास करावा.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.  

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीच्या दिवसांत पदार्थ बनवून देण्याची इच्छा होणे आणि प्रत्यक्षात त्याच सेवेसाठी साधिकेला बोलावणे 

‘वर्ष २०२४ च्या नवरात्रीपूर्वी माझ्या मनात ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीत काहीतरी खायचे पदार्थ बनवून देऊया’, असे विचार येत होते. त्यानुसार मी मानसरित्या त्यांना पुरणपोळी, गुलाबजाम, खीर, शिरा इत्यादी पदार्थ बनवून अर्पण करू लागले…

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करतांना साधकाच्या मनात आलेले विचार

‘माझ्या मनात विचार आला, ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, असे- प.पू. भक्तराज महाराज यांनी म्हटले आहे. ‘मन प्रकृतीशी चिकटलेले असते. डोळे हे त्याचे माध्यम आहेत. मनाला अंतःचक्षू आणि भावचक्षू यांनी चैतन्याशी म्हणजे ईश्वराशी जोडले की, ते बाह्य प्रकृतीपासून निर्लिप्त होऊन परब्रह्म स्वरूपात विलीन होऊ लागते…

स्वतःकडून झालेल्या चुकीसाठी प्रायश्चित घेणे आणि मनाला स्वयंसूचना देणे, यांमुळे साधिकेला स्वतःमध्ये पालट जाणवणे

‘माझ्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा ‘माझ्याच स्वभावदोषामुळे माझ्याकडून चूक झाली आहे आणि ती चूक सुधारली पाहिजे’, असे मला वाटले. देवाने त्यावर मला प्रायश्चित घेण्यास आणि ती ज्या स्वभावदोषामुळे झाली, त्यावर मनाला स्वयंसूचना देण्यास सुचवले…

श्रीकृष्णाशी सूक्ष्मातून संवाद साधणारी देवद (पनवेल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. दुर्वा नित्यानंद भिसे (वय ८ वर्षे) !

दुर्वाला कधी कंटाळा येतो, तेव्हा ती श्रीकृष्णाशी बोलते. ती त्याला मनातील प्रसंग सांगते. एकदा तिला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाचे उत्तर येत नव्हते. तेव्हा तिने त्या प्रश्नाचे उत्तर श्रीकृष्णाला विचारले. त्यानंतर तिला आतून जे उत्तर मिळाले, ते तिने उत्तरपत्रिकेत लिहिले आणि ते उत्तर योग्य होते.